दर्शनासाठी आलेल्या भाविकांना काही किरकोळ कारणावरून मारहाण
सिमेंटचा ब्लॉक, स्टीलची बकेट हातात घेवून मारहाण
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/१०/२०२५ – पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना काही किरकोळ कारणावरून मारहाण करण्यात आली होती.यात हकीकत अशी की,दि. 07/10/2025 रोजी यातील फिर्यादी प्रदीप महादेव पाटील वय 69 वर्ष धंदा-सेवानिवृत्त रा. ससाणे कॉलणी केशव नगर, मुंडवा पुणे व त्यांचे मित्र दिलीप वर्णे, नंदकिशोर मोरे, राऊत आप्पा चलवादी व इतर 29 असे एकुण 33 लोक सर्व रा पुणे हे पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेवून पश्चिमद्वार येथे फोटो काढत असताना एका अनोळखी इसमाने दुचाकी गाडीवर येवुन शिवीगाळी करून तेथुन निघुन गेला.

त्यानंतर पश्चिमद्भार येथुन पुढे चौफाळाकडे येत असताना गंजेवार बोळात गंजेवार भांड्याचे दुकानासमोर आले असता तेथे लगेच परत त्याचे सोबत अजुन दोन अनोळखी इसमांना सोबत घेवुन आला. तेव्हा दिलीप वर्णे यांनी त्या अनोळखी इसमास तुम्ही आम्हाला शिवीगाळ का केली ? असे विचारताच त्यातील स्वप्नील अहिरे नावाच्या इसमाने तेथेच रोडवर असलेला सिमेंटचा ब्लॉक हातात घेवुन दिलीप वर्णे यांचे डोकीत मारुन गंभीर जखमी केले तर चलवादी यांना पायावर मारुन जखमी केले. तेव्हा फिर्यादी प्रदीप महादेव पाटील व नंदकिशोर मोरे असे मध्ये गेले असता माऊली लोंढे याने तेथेच असलेल्या चहाचे टपरी जवळील स्टीलची बकेट हातात घेवुन फिर्यादी महादेव पाटील चे पाठीत व नंदकिशोर मोरे यांचे हातावर मारुन जखमी केले तसेच निळा टी शर्ट घातलेल्या त्यांच्यासोबतच्या अनोळखी इसमाने फिर्यादी महादेव पाटील ला हाताने मारहाण करुन मोठमोठ्याने शिवीगाळी केली. म्हणुन माझी 1) स्वप्निल अहिरे 2) माऊली लोंढे 3) निळा टी शर्ट घातलेला अनोळखी इसम सर्व रा. व्यासनारायण झोपडपट्टी पंढरपुर या इसमांविरुद्ध फिर्यादी महादेव पाटील यांची कायदेशीर तक्रार आहे असे म्हणून वगैरे मजकूरची फिर्याद दिल्याने सदर गुन्हा रजिष्टरी दाखल करण्यात आला आहे.पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुरनं- 650/2025 बी एन एस ११८(२), ११८(१), ११५(२), ३५२,३५१, ३(५) प्रमाणे नोंद केली असून याचा तपास पंढरपूर शहर पोलिस करत आहेत.
वास्तविक अशा घटनांमुळे पंढरपूर शहराची प्रतिमा खराब होत आहे.अनेकदा रिक्षावाले लुटालूट किंवा फसवाफसवी करतात काही राहण्यासाठी जागा देतो म्हणून फसवणूक केल्याच्या तक्रारी भाविक करत आहेत.या साठी काही ठोस आणि कठोर कारवाई करावी लागणार आहे.