भोर तालुका लघु पशु सर्व चिकित्सालंय, मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजना व पशुवैद्यकीय दवाखाना उत्रोली यांच्या संयुक्त विद्यमाने पशुरोग निदान व उपचार शिबीर संपन्न

भोर तालुका लघु पशु सर्व चिकित्सालंय, मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजना व पशुवैद्यकीय दवाखाना उत्रोली यांच्या संयुक्त विद्यमाने पशुरोग निदान व उपचार शिबीर संपन्न

उत्रोली भोर तालुका/ज्ञानप्रवाह न्यूज,दि 10/ 10/2025-उत्रोली भोर तालुका येथे दि 10/ 10/2025 शुक्रवार रोजी 9:00 ते 12:00 पर्यंत भोर तालुका लघु पशु सर्व चिकित्सालंय, मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजना व पशुवैद्यकीय दवाखाना उत्रोली यांच्या संयुक्त विद्यमाने पशुरोग निदान व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिराअंतर्गत गर्भ निदान व वंधत्व तपासणी व उपचार, कृत्रिम रेतन व वळूचे खच्चीकरण,आजारी जनावरांवर उपचार,लाळ खुरकुत रोग प्रतिबंधक लसीकरण, अँटी रेबीज लसीकरण,गोचीड गोमाशा प्रतिबंधक औषधाची फवारणी, जनावरांना खनिज औषधं वाटप करण्यात आले.

सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धनचे डॉ.किशोर मुळे भोर, मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजनाचे डॉ.पी.डी.बनसोडे ,डॉ.मंगेश टिळेकर पशुधन पर्यवेक्षक उत्रोली, डॉ.संतोष निकम पशुधन पर्यवेक्षक निगुडघर,डॉ.संजय गजरे पशुधन पर्यवेक्षक महूडे ,श्री सूर्यवंशी, श्री शेख,श्री सोनावणे,श्री वाडकर,श्री चवरे,श्री वीर तसेच पशुसखी शिवतरे,कुंभार, लोहकरे आदींच्या उपस्थितीत हे शिबिर झाले.या शिबीरासाठी सहकार्य केल्याबद्दल उत्रोली ग्रामस्थ मंडळी शेतकरी बांधव यांचे भोर तालुका लघु पशु सर्व चिकित्सालंय, मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजना व पशु वैद्यकीय दवाखाना उत्रोली यांच्यावतीने आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Back To Top