मानेगावला ऊर्जेची नवी दिशा : भगीरथ योजनेतून ११ के.व्ही.ए. लाईनचे आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मानेगावला ऊर्जेची नवी दिशा : भगीरथ योजनेतून ११ के.व्ही.ए. लाईनचे आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

माढा / ज्ञानप्रवाह न्यूज– माढा तालुक्यातील विकासाला नवी गती देण्यासाठी आणि विजेच्या तुटवड्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी भगीरथ योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ११ के.व्ही.ए.विजेच्या लाईनचे उद्घाटन मानेगाव सबस्टेशन येथे आमदार अभिजीत धनंजय पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.

विजेच्या स्थिर पुरवठ्यासाठी ठोस पाऊल

या लोकार्पण सोहळ्यात बोलताना आमदार अभिजीत पाटील म्हणाले, माढा तालुक्यातील प्रत्येक गावाला अखंड आणि स्थिर वीजपुरवठा मिळावा,हा आमचा संकल्प आहे. प्रत्येक डीपीवरील अ‍ॅडिशनल लाईनचे प्रस्ताव पाठवले आहेत आणि भविष्यात कोणत्याही भागात विजेचा तुटवडा निर्माण होऊ नये,यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येतील.त्यांनी पुढे सांगितले की,पूरग्रस्त भागातील मदत ही आमची जबाबदारी आहे, जाहिरात नव्हे. आम्ही जे काही करतो ते जनतेच्या सेवेसाठी आणि कर्तव्य म्हणूनच करतो.

ग्रामविकासाला नवी चालना

मानेगाव व परिसरातील नागरिकांनी या नव्या वीज पुरवठ्याचे स्वागत केले असून, गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नव्या लाईनमुळे शेती, उद्योग आणि दैनंदिन जीवनातील वीजसंबंधी अडचणी दूर होऊन विकासाच्या नव्या संधी खुल्या होणार आहेत.

मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्यास ज्येष्ठ नेते विलास देशमुख, बाळासाहेब ढवळे,रामकाका मस्के,सुरेश पाटील,प्रतापराव देशमुख, बाळासाहेब ढेकणे,सुवर्णाताई शिवपुरे,विनंतीताई कुलकर्णी, भाऊसाहेब महाडिक,निलेश बापू पाटील,दिनेश जगदाळे, ऋषिकेश तांबिले, महादेव साबळे, संजय पारडे, बप्पा शेळके, राहुल पारडे, मिटू मुकणे, बापू भोगे, विलास पारडे, आबासाहेब साठे, बाळासाहेब राऊत, संजय तांबिले, गणेश उमाटे आदी मान्यवरांसह मानेगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top