सामाजिक एकतेचा दिवाळी उत्सव : सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून पारधी समाजासोबत दीपावली साजरी

सामाजिक एकतेचा दिवाळी उत्सव : सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून पारधी समाजासोबत दीपावली साजरी

सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२० ऑक्टोबर २०२५ –जनतेसोबतच पोलिसांची दिवाळी या भावनेतून सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने पारधी समाजासोबत दीपावली सण साजरा केला.पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या ऑपरेशन पहाट या संकल्पनेतून मोहोळ पोलीस ठाण्याच्या वतीने चिंचोली काटी येथे हा उपक्रम राबविण्यात आला.

ऑपरेशन पहाटचा मानवी चेहरा

या उपक्रमांतर्गत पारधी समाजातील ११५ कुटुंबांसोबत दीपावली उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी फराळ आणि संसारोपयोगी साहित्याचे वाटप करून पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपली. कार्यक्रमात पारधी समाजाचे अध्यक्ष मच्छिंद्र काळे यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचा वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.

पारधी समाजासाठी कल्याणकारी योजना

कार्यक्रमादरम्यान पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी समाजातील महिला,पुरुष आणि तरुणांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की,शिक्षणानुसार रोजगार मिळवून देण्यासाठी पोलीस विभाग स्तरा वरून प्रयत्न सुरू आहेत. महिलांसाठी शिलाई मशीन,पिठाची गिरणी,पापड बनवण्याची मशीन यांसारख्या सुविधा अनुदानावर उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.समाजाने या योजनांचा लाभ घ्यावा.

सामाजिक सलोखा आणि विकासाचे पाऊल

या कार्यक्रमाला भांबेवाडी, नरखेड, चिंचोली काटी, भोयरे आदी भागातील पारधी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, पोहेकॉ गजानन माळी,दयानंद हेंबाडे, संदीप सावंत, अमोल जगताप, स्वप्निल कुबेर, तसेच आदिवासी पारधी संघटनेचे मच्छिंद्र काळे,जेऊर काळे आदींसह सुमारे १५० समाजबांधव उपस्थित होते.

मानवतेचा संदेश

ऑपरेशन पहाट उपक्रमातून पोलीस प्रशासनाचा मानवी चेहरा पुन्हा एकदा उजळून निघाला आहे.सामाजिक सलोखा, जनजागृती आणि विकासाचे नवे पर्व सुरू करण्याचा संकल्प या माध्यमातून साकार झाला.

ज्ञानप्रवाहन्यूज,सोलापूरग्रामीणपोलीस, ऑपरेशनपहाट, अतुलकुलकर्णी, पारधीसमाज,दीपावलीउत्सव, सामाजिकएकता,मोहोलपोलीसठाणे, CommunityPolicing,PoliceWithPeople,SolapurPositiveStories, मराठी बातम्या, HumanityInUniform,EmpowermentThroughAction, trending , DiwaliOfUnity,Trend,

Leave a Reply

Back To Top