पंढरपूरमध्ये महसूल विभागातील मंडल अधिकाऱ्याला ₹ 20 हजार लाच घेताना ACB ने रंगेहात पकडले
एसीबीची धडक कारवाई : मंडल अधिकारी आणि एजंटवर गुन्हा दाखल 20 हजारांची लाच स्वीकृती
सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.08 डिसेंबर 2025 :लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांनी पंढरपूरमध्ये मोठी कारवाई करत महसूल विभागातील मंडल अधिकारी वर्ग–3 व खाजगी इसमाविरुद्ध लाच प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. शेतजमीन बिनशेती करण्याच्या प्रक्रियेसाठी तक्रारदाराकडून ₹ 20,000/- लाच घेणाऱ्या मंडल अधिकाऱ्याला ACB ने रंगेहात पकडले.
यात आरोपी दिलीप दिगंबर सरवदे वय 56)– मंडल अधिकारी वर्ग-3 खर्डी मंडल, ता.पंढरपूर आणि तुकाराम आसबे वय 45 – खाजगी इसम, रा.तावशी असे आहेत.

या प्रकरणाचे स्वरूप असे आहे – तक्रारदाराने शेतजमीन बिनशेती करण्यासाठी प्रांत कार्यालय पंढरपूर येथे अर्ज केला होता.संबंधित चौकशी करून भुसंपादन नसल्याचा अहवाल तहसील कार्यालयाला पाठविण्यासाठी आरोपी दिलीप सरवदे यांनी यापूर्वी ₹5,000/- घेतल्याचे मान्य केले.यानंतर पडताळणी दरम्यान सरवदे यांनी आणखी ₹20,000/- लाचेची मागणी केली व ती रक्कम स्वतः स्वीकारली. त्याचवेळी ACB ने त्यांना रंगेहात पकडले. तर आरोपी क्र. 2 तुकाराम आसबे यांनीही तक्रारदाराकडून आरोपी मंडल अधिकाऱ्यासाठी ₹20,000 ची मागणी केली असल्याचे पडताळणीत स्पष्ट झाले.
यावेळी सापळा अधिकारी म्हणून ACB पोलीस निरीक्षक रविंद्र लांभाते सोलापूर आणि तपास अधिकारी म्हणून ACB पोलीस निरीक्षक शैलेश पवार सोलापूर यांनी काम पाहिले.
ही कारवाई ACB पोलीस उपायुक्त पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे पुणे, ACB अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या टीममध्ये उपअधीक्षक प्रशांत चौगुले,पोलीस निरीक्षक रविंद्र लांभाते,पोलीस नाईक संतोष नरोटे,पोकों गजानन किणगी,राहूल गायकवाड यांचा समावेश होता.
ACB ची जनतेला सूचना :
लोकसेवक शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) हे कोणतेही शासकीय काम करून देणेसाठी कायदेशीर फी व्यतरिक्त अन्य लाचेची मागणी करित असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन प्रशांत चौगुले पोलीस उपअधीक्षक एसीबी सोलापूर मो.क्र. ९८२३२२५४६५ यांनी केले आहे.
संपर्क पत्ता- पोलीस उपअधीक्षक ॲन्टी करप्शन ब्युरो श्री छत्रपती शिवाजी महाराज रंगभवन चौक, सोलापूर.
संकेतस्थळ www.acbmaharashtra.gov.in
ई मेल- www.acbwebmail@mahapolice.gov.in
ऑनलाईन तक्रार ॲप- acbmaharashtra.net
टोल फ्री क्रमांक १०६४
दुरध्वनी क्रमांक- ०२१७-२३१२६६८
व्हॉटस ॲप क्रमांक- ९४०४००१०६४

