टोकियो पॅराऑलिंपिक स्पर्धेत भाविनाबेन पटेल आणि निषाद कुमार यांनी पटकावले रौप्यपदक

टोकियो पॅराऑलिंपिक स्पर्धेत भाविनाबेन पटेल आणि निषाद कुमार यांनी पटकावले रौप्यपदक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले अभिनंदन Bhavinaben Patel and Nishad Kumar win silver medals at Tokyo Paralympics – Congratulations by Chief Minister Uddhav Thackeray, Sports and Youth Welfare Minister Sunil Kedar

मुंबई,दि.29 /08/2021: टोकियो पॅराऑलिंपिक स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये भाविनाबेन पटेल आणि उंचउडी मध्ये निषाद कुमार यांनी रौप्यपदक पटकावले आहे.या दोघांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी अभिनंदन केले आहे.

भारतासाठी दोन रौप्यपदक पटकावून भाविनाबेन आणि निषाद यांनी तमाम देशवासियांच्यावतीने आज राष्ट्रीय क्रीडा दिनी मेजर ध्यानचंद यांचे संस्मरण करत असताना त्यांना अभिवादनच केले आहे.भाविनाबेन,निषाद यांचे या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन तसेच राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त क्रीडा क्षेत्रात कार्यरत प्रशिक्षक, मार्गदर्शक, खेळाडू आणि त्यांच्या मागे उभे राहणाऱ्या कुटुंबियांनाही हार्दिक शुभेच्छा दिल्या .

भारताच्या भाविनाबेन पटेलने पॅराऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकून इतिहास रचला असल्याचे कौतुकोद्गार राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी काढले आहे.

श्री.केदार म्हणाले,भाविनाबेन पटेल ह्या सामान्य कुटुंबातील असून कठोर परिश्रम घेऊन भाविनाने भारताला पहिलं पदक जिंकून दिले आहे. टेबल टेनिसमध्ये तिने अंतिम फेरी गाठली.पण सुवर्ण पदकाने तिला हुलकावणी दिली मात्र तिने रौप्यपदक जिंकलं आहे. पॅराऑलिम्पिकमध्ये भारताचे हे पहिले पदक आहे. भाविना यांनी रौप्यपदक जिंकत इतिहासही रचला. पॅरालिम्पिक स्पर्धेत अंतिम सामन्यात पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला ठरली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: