पत्रकार समाजाचा मार्गदर्शक दीपस्तंभ : लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक बळकट करण्याची गरज : प्रांताधिकारी सचिन इथापे

पत्रकारिता journalism समाजाला दिशा देण्याचे प्रभावी माध्यम : प्रांताधिकारी सचिन इथापे sachin ithape

पत्रकार समाजाचा मार्गदर्शक दीपस्तंभ :लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक बळकट करण्याची गरज : प्रांताधिकारी सचिन इथापे

वर्तमानपत्रांनी समाज सुधारला,सरकारे हादरवली – प्रांताधिकारी इथापे

पत्रकारिता केवळ बातम्या देण्याचे माध्यम नसून समाजाला योग्य दिशा देणारी शक्ती आहे, असे प्रतिपादन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी पंढरपूर येथे आयोजित मराठी पत्रकार दिन कार्यक्रमात केले. आचार्य बाळशास्त्री जांभेकर acharya balshastri jambhekar यांना अभिवादन करून पत्रकारितेच्या सामाजिक भूमिकेवर प्रकाश टाकण्यात आला.

Pandharpur patrakar din पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज, दि.०६/०१/२०२६ – पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याची प्रक्रिया नसून समाजाला योग्य दिशा देण्याचे प्रभावी माध्यम आहे. पत्रकार हे समाजाचे मार्गदर्शक दीपस्तंभ असून लोकशाहीचा पाया मजबूत करण्यामध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले.

दि. ०६ जानेवारी रोजी राज्यभर मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर अधिनस्त उप माहिती कार्यालय पंढरपूर येथे पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमास पंढरपूर तालुका व शहरातील विविध माध्यमांचे संपादक,पत्रकार व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रांताधिकारी सचिन इथापे म्हणाले की, पूर्वी पत्रकारिता केवळ छापील वर्तमानपत्रांपुरती मर्यादित होती; मात्र आज दूरचित्रवाहिन्या, समाजमाध्यमांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तरीही सकाळी वर्तमानपत्रातील बातम्या वाचण्याची ओढ आजही कायम आहे. वर्तमानपत्रातील अग्रलेखांनी अनेकदा सरकारांमध्ये उलथापालथ घडवून आणली आहे. समाज सुधारण्यासाठी आणि लोकशाही सुदृढ ठेवण्यासाठी वर्तमानपत्रांची भूमिका अनन्यसाधारण आहे.

इतिहासाकडे पाहिले असता, जे समाजसुधारक झाले त्यांनी सर्वप्रथम वर्तमानपत्रांच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, अज्ञान आणि सामाजिक कुप्रथांविरोधात लेखन केले. ब्रिटिश काळात पत्रकारितेने स्वातंत्र्य, न्याय व समानतेची जाणीव जनतेमध्ये निर्माण करत राष्ट्रीय चेतना जागृत केली. समाजाचा आवाज मांडण्याचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे पत्रकारिता असल्याचे त्यांनी नमूद केले.पंढरपूरच्या पत्रकारांच्या कार्याची दखल घेण्या इतके मोठे योगदान पत्रकारांनी दिले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल कुलकर्णी यांनी केले.

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना पत्रकार दिनानिमित्त उप माहिती कार्यालय पंढरपूर येथे पंढरपूर विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे म्हणाले की, पत्रकारितेकडे समाजाचे प्रबोधन तसेच शासन व प्रशासनावर अंकुश ठेवणारे प्रभावी माध्यम म्हणून पाहिले जाते. दैनंदिन जीवनातील घटनांचे प्रतिबिंब समाजात उमटवण्याचे कार्य पत्रकार करतात. लोकशाहीतील चतुर्थ स्तंभ म्हणून पत्रकारितेचे महत्त्व मोठे असून, पत्रकार दिन हा या स्तंभाला बळ देणारा दिवस आहे.

Leave a Reply

Back To Top