घरांची पात्रता ठरविण्यासाठी सन 2011 सालच्या शासन निर्णयाची अंमलबाजवणी करावी – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

घरांची पात्रता ठरविण्यासाठी सन 2011 सालच्या शासन निर्णयाची अंमलबाजवणी करावी – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले Government decision of 2011 should be implemented to determine the eligibility of houses – Union Minister of State Ramdas Athawale

  मुंबई - झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प तसेच विमानतळ परिसरातील झोपड्यांचे पुनर्वसन आणि अन्य शासकीय प्रकल्पात बाधित झालेल्या झोपड्यांचे पुनर्वसन करताना पात्र अपात्रता निश्चित करण्यासाठी सन 2011 सालच्या घरांना पात्र करणाऱ्या राज्य सरकारच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी सूचना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

बांद्रा येथील म्हाडा कार्यालयातील गुलजारीलाल नंदा सभागृहात आयोजित शासकीय बैठकीत ना.रामदास आठवले यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी , म्हाडा सचिव राजकुमार सागर , उपजिल्हाधिकरी एस आर ए चे विश्वास गजरे तसेच रिपाइंचे राज्य सचिव सुमित वजाळे, युवराज सावंत, हेमंत सावंत, सतीश निकाळजे, नवीन लादे, रतन अस्वारे, घनश्याम चिरणकर आदी अनेक अधिकारी उपस्थित होते.

  मुंबई विमानतळ परिसरातील झोपडपट्ट्यांचे एमएमआरडीए ने सर्वेक्षण केले असून त्यात 80 हजार झोपड्यांची नोंद झाली आहे त्यावर स्थानिक झोपडीवासीयांचा आक्षेप असून या भागात केवळ 80 हजार झोपड्या नसून त्यापेक्षा अधिक किमान 1 लाख झोपड्या असतील असा दावा स्थानिक जनतेने आणि रिपाइं कार्यकर्त्यानी केला आहे.त्यानुसार विमानतळ परिसरातील झोपड्यांचा सर्व्हे पुन्हा करण्यात यावा अशी सूचना ना रामदास आठवले यांनी केली आहे. विमानतळ परिसरातील झोपड्यांचे पुनर्वसन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झालेल्या 

सन 2011 च्या झोपड्या पत्र करणारा शासन निर्णयाची अंमलबाजवणी करून 2011 पर्यंत च्या झोपड्या पात्र करण्यात याव्यात अशी सूचना ना.रामदास आठवले यांनी केली आहे.विमानतळ परिसर पुनर्विकास काम गौतम अदानी यांच्या अदानी समूहाकडे असून विमानतळ परिसरातील झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी केंद्रीय विमान उड्डयन मंत्रालयाची परवानगी अद्याप मिळालेली नाही .त्या साठी आपण केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ना ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेणार असल्याचे ना. रामदास आठवले यावेळी म्हणाले.


अंधेरी प्रकाशवाडी येथील 97 नागरिकांना 7 वर्षांपूर्वी पात्र केल्यानंतर आता पुन्हा अपात्र करण्यात येत आहे. ही कारवाई चुकीची असून त्यांना 2011च्या शासन निर्णयानुसार पात्र करावे त्यांना बेघर करू नये अशी सूचना ना रामदास आठवले यांनी केली. या बैठकीत सर्व अधिकारी वर्गाने सन 2011 च्या शासन निर्णयानुसार झोपड्यांची पात्रता निश्चित करण्यात येईल असे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: