अमानवी! चिमुकल्याच्या गळ्याला चाकू लावून सख्या भावांनी केला विवाहितेवर बलात्कार


हायलाइट्स:

  • चिमुकल्याच्या गळ्याला चाकू लावून विवाहितेवर बलात्‍कार
  • धक्कादायक घटनेनं परिसरात खळबळ
  • आरोपी सख्‍ख्‍या भावांचा नियमित जामीन अर्ज फेटाळला

औरंगाबाद : तीन महिन्‍यांच्‍या चिमुकल्याच्या गळ्याला चाकू लावून विवाहितेवर तिच्‍या घरात बलात्‍कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी आरोपी अंकुश प्रेमनाथ जगधने व लहू प्रेमनाथ जगधने या सख्‍ख्‍या भावांचा नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्‍यायाधीश एस. एस. भिष्‍मा यांनी फेटाळला.

या प्रकरणात २५ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, विवाहितेचा पती गॅस वेल्डिंगचे काम करतो आणि २२ ऑगस्‍ट रोजी तो कांदा लागवडीसाठी शेतात गेला होता. त्‍यावेळी घरी विवाहितेसह तिचा तीन महिन्‍यांचा मुलगा होता. दुपारी दोन वाजेच्‍या सुमारास संधी साधत विवाहितेच्या घराशेजारी राहणारे अंकुश प्रेमनाथ जगधने (३६) व लहु प्रेमनाथ जगधने (३०, दोघे रा. ता. पैठण) हे आरोपी भाऊ विवाहितेच्‍या घराच्‍या पाठीमागील दरवाज्याने घरात घुसले. तसंच विवाहितेच्‍या मुलाच्‍या गळ्याला चाकू लावून आळी-पाळीने विवाहितेवर बलात्‍कार केला. कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली.

शाळेतील मुलीसोबत चित्रकला शिक्षकाचं संतापजनक कृत्य; कोर्टाने दिला दणका

त्यानंतर विवाहितेची प्रकृती खराब झाल्याने तिच्‍या पतीने तिला माहेरी सोडले. तिथे विवाहितेच्या आईने चौकशी केली असता संबंधित घटना तिने सांगितली. या प्रकरणात बीडकीन पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल होऊन आरोपींना १० सप्‍टेंबर रोजी अटक करण्‍यात आली. त्यानंतर त्‍यांची आधी पोलीस कोठडीत व नंतर न्‍यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

दरम्यान, आरोपींनी नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला असता, सहाय्यक लोकाभियोक्ता अरविंद बागुल यांनी जामिनाला विरोध करत फिर्यादीची बाजू मांडली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: