विजयासाठी मुंबई इंडियन्सने केला मोठा बदल: दिल्लीविरुद्ध असा आहे संघ


शारजाह: आयपीएलच्या १४व्या हंगामात आज शनिवारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात लढत सुरू झाली आहे. या लढतीत दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली संघाने या लढती आधीच प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी ही लढत अधिक महत्त्वाची ठरणार आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना यासह पुढील दोन्ही लढती जिंकायच्या आहे.

वाचा- MI vs DC: आज पराभव झाल्यास मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफच्या आशा संपुष्टात येतील का? असे आहे गणित

वाचा- मुंबई इंडियन्सच्या कोचने केली हार्दिक पंड्याची पोल खोल, उपस्थित केले गंभीर प्रश्न

खरब फॉर्ममुळे मुंबईचा संघ गुणतक्तात सहाव्या स्थानावर आहे. आज दिल्लीविरुद्ध होणाऱ्या लढतीत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने संघात एक मोठा बदल केला आहे. रोहितने फिरकीपटू राहुल चाहरच्या जागी जयंत यादव याचा समावेश केला आहे. २०१९ पासून यादवने मुंबईकडून ७ सामने खेळले आहेत. त्यापैकी चार लढती दिल्ली संघाविरुद्ध होत्या.

वाचा-IPL मध्ये आज द्विशतकचा इतिहास घडणार, या खेळाडूच्या नावावर होणार विक्रम

जयंत यादवची दिल्लीविरुद्धची कामगिरी

२०१९- ०/२५
२०२०- ०/१८
२०२०-१/२५
२०२१-१/२५

वाचा- IPLच्या इतिहासातील सर्वात मोठा विक्रम धोक्यात; या खेळाडूकडे सुवर्ण संधी

असा आहे मुंबई इंडियन्सचा संघ-
रोहित शर्मा, क्विंटन डीकॉक, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, क्रुणाल पंड्या, नाथन कुल्टर नाईल, जयंत यादव, जसप्रती बुमराह, ट्रेंट बोल्ट.

मुंबई इंडियन्स प्रमाणेच दिल्ली कॅपिटल्सने संघाने देखील एक बदल केला आहे. ललित यादवच्या जागी पृथ्वी शॉचा संघात समावेश करण्यात आला आहे. असा आहे दिल्लीचा संघ-



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: