युवराज सिंगने केले वाघाशी दोन हात, व्हिडीओ पाहाल तर तुम्हीही हैराण व्हाल…
युवराजने शनिवारी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये युवराज सिंग वाघाशी लढताना दिसत आहे. युवराज आणि लायगर नावाच्या वाघामध्ये रस्सीखेचचा डाव रंगला. या सामन्यात लायगरने बाजी मारली. युवराजने खूप प्रयत्न केले, पण शेवटी तो थकला. आणि त्याने निराशेने हातातील दोरी सोडली. या सामन्याचा निकाल लायगरच्या बाजूने लागला असला तरी चाहत्यांना त्याचा हा व्हिडिओ खूप आवडल्याचे दिसून येत आहे.
इथे प्राणी सुरक्षित ठेवले जाते : युवराज
फेम पार्क हे एक सुरक्षित आश्रयस्थान आहे, जिथे सर्व प्राण्यांची काळजी घेतली जाते आणि त्यांना सुरक्षित वातावरणात ठेवले जाते. जे लोक प्राण्यांची काळजी घेतात, ते पूर्णपणे प्रशिक्षित असतात आणि त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करतात. या उद्यानात कोणत्याही प्राण्याला हानी पोहोचलेली नाही, असंही त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. युवराजने त्याच्या उत्कृष्ट अष्टपैलू खेळीच्या जोरावर क्रिकेट विश्वात आपले एक वेगळे स्थान प्राप्त केले आहे. खेळातून निवृत्त झाल्यानंतरही या खेळाडूच्या लोकप्रियतेत तसूभरही घट झालेली नाही.