कार्य निसर्ग संवर्धनाचे सामाजिक उपक्रम राबवून लक्ष्मण तात्या धनवडे यांचा वाढदिवस साजरा
पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०९/२०२४ – नारायण चिंचोली तालुका पंढरपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण तात्या धनवडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून करण्यात आला.वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन व संवर्धन करणे काळाची गरज आहे ही तात्यांची शिकवण ओळखून धनवडे तात्या मित्र मंडळाने 150 केशर आंबे,100 फणस रोपांची लागवड केली. ही मंडळी फक्त लागवड करूनच थांबली नाही तर त्याला चांगल्या प्रकारचे लोखंडे जाळीचे ट्री गार्ड बनवले व लावलेले प्रत्येक रोप जगवण्यासाठी संबंधित कुटुंबप्रमुखावर जबाबदारी सोपवण्यात आली .

सकाळी 9:00 वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिर जवळील पश्चिम द्वाराजवळ दर्शन घेऊन बाहेर पडणाऱ्या भाविकांना प्रसादाचे वाटप करणेत आले. याचा 2500 वारकऱ्यांनी लाभ घेतला. सकाळी 10.00 वाजता शालेय विद्यार्थ्यांना जीवनस्तव युक्त खाऊचे वाटप करणेत आले. यामध्ये नारायण चिंचोली, भैरवनाथ वाडी,पटवर्धन कुरोली पुनर्वसन, धुपे वस्ती येथील 350 विद्यार्थ्यांना पूरक आहार, स्टेनलेस स्टीलचा डबा व टिफिन बॅग यांचे वाटप करण्यात आले. सकाळी 11 वाजता नारायण चिंचोली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजस्व अभियानाचे उद्घाटन युवा नेते प्रणव परिचारक, गटविकास अधिकारी सुशील संसारे, तहसीलदार सचिन लंगोटे, संचालक लक्ष्मण तात्या धनवडे व जिल्हाप्रमुख महावीर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

यामध्ये गावातील व परिसरातील नागरिकांची कागदपत्रासाठी होणारी भटकंती थांबवून गावातच प्रधानमंत्री आवास योजनेची 35 घरकुले, 300( आयुष्यमान भारत) गोल्डन कार्ड, 210 ऑनलाइन ई रेशन कार्ड, 125 बांधकाम कामगार कार्ड, 64 उत्पन्नाचे व अधिवास प्रमाणपत्रे, 127 आधार कार्ड दुरुस्त्या यासारख्या शासकीय सेवा जागेवरच देण्यात आल्या. दुपारी 1:00 वाजता मातोश्री वृद्ध आश्रमातील निराधार मातापित्यांना मिष्टांण भोजन देऊन त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले.वाढदिवसानिमित्त कृतिशील उपक्रम राबवल्याबद्दल नारायण चिंचोली गावाचे व लक्ष्मण तात्या धनवडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी गावच्या सरपंच नर्मदाताई धनवडे, उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण, मा. सरपंच विठ्ठल माने,नितीन मस्के, बळवंत धनवडे, विष्णू माने, नारायण गुंड, सचिन घाडगे, साधू नलवडे, सचिन भडकवाड, दत्ता बनसोडे, ज्ञानेश्वर वाघमोडे, सज्जन हाडमोडे ,दीपक गुंड, सज्जन गुंड ,अभिजीत कोले, शिवलिंग हिंगमिरे, विजय कोळेकर ,पोपट पाटील, महेश माने, माऊली मस्के, शिवाजी भोसले, समाधान बचुटे, अमोल हाडमोडे ,तुकाराम कोल्हे, शिवाजी वसेकर ,बापू वसेकर, श्रीधर कोळेकर ,सुनील माने, मुकुंद घाडगे ,बाळू बनसोडे ,दत्ता बनसोडे, हनुमंत सोनवर, दिलीप गाजरे ,पांडुरंग घाडगे, दादासो डुबल, भागवत सोनवर ,विष्णू हजारे, डॉ.सरडे ,दत्ता कोळेकर ,भाऊसाहेब माने, काका डुबल यांच्यासह गावातील अनेक पदाधिकारी ग्रामस्थ, महिला भगिनी व निरनिराळ्या योजनेचे लाभार्थी हजर होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक दत्तात्रय मस्के सर यांनी केले. आभार बळवंत धनवडे यांनी मानले.