डिजिटल मीडियाचे प्रश्न मार्गी लावणार : मंत्री राजेश टोपे आणि अमित देशमुख यांची ग्वाही

डिजिटल मीडियाचे प्रश्न मार्गी लावणार : मंत्री राजेश टोपे आणि अमित देशमुख यांची ग्वाही Digital media issues will be sorted out: Testimony of Minister Rajesh Tope and Amit Deshmukh
राज्यातील कोविड योध्यांचा कृतज्ञतापूर्ण गौरव
   मुंबई : गेल्या काही वर्षातील आलेख पाहिला असता प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया मागे पडत चालले असून डिजिटल मीडिया आता फ्रंट सीटवर येऊन पोहोचला आहे असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.तसेच डिजीटल मिडीयाचे प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही त्यांनी दिली.

   "महाराष्ट्राचे कोविड योद्धा" या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेने या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहात केले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे व राज्याचे संस्कृतिक मंत्री अमित देशमुख उपस्थित होते. संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी प्रास्ताविक तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे स्वागत केले .मंत्री अमित देशमुख यांचे उपाध्यक्ष तुलसीदास भोईटे व प्रफुल्ल वाघुले यांनी केले.कोरोना महामारीच्या काळामध्ये राज्या मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना यावेळी महाराष्ट्राचे कोविड योध्या म्हणून गौरवण्यात आले.

   यावेळी बोलताना वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे खरेच डिजिटल हिरो आहेत असे प्रतिपादन केले. राज्यामध्ये कोरोना महामारी सुरु असताना राज्याचा कारभार त्यांनी डिजिटल व्यासपीठावरून उत्तम सांभाळला आहे . कोरोना मध्ये अनाथ झालेल्या मुलांना प्रत्येकी पाच लाख रुपये मुख्यमंत्री देणार असल्याचेही ते म्हणाले. 

   यावेळी नंदकुमार सुतार सचिव, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना , राजू वाघमारे राष्ट्रीय समन्वयक, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, राज्य कार्यकारिणी सदस्य – कुंदन हुलावळे, महेश कुगावकर, दीपक नलावडे. संजय भैरे (मुंबई अध्यक्ष), प्रफुल्ल वाघुले (ठाणे जिल्हाध्यक्ष), संजय जेवरीकर (मराठवाडा कार्याध्यक्ष) व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्राचे कोविड योद्धा

 सामाजिक संस्था योगदान विभाग 
भारतीय जैन संघटना, महाराष्ट्र – केतनभाई शाह, सोलापूर

१. मुस्लिम सत्यशोधक मंडळ, पुणे – डॉ. शमसुद्दीन तांबोळी
२. भारतीय जैन संघटना, महाराष्ट्र – केतनभाई शाह, सोलापूर
३. कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटी, कोल्हापूर – जाफरबाबा सय्यद
४. मातृभूमी प्रतिष्ठान, बार्शी – संतोष ठोंबरे
५. वजीर रेस्क्यू फोर्स, शिरोळ जि. कोल्हापूर – रउफ पटेल
६. हिंदवी परिवार महाराष्ट्र – डॉ. शिवरत्न शेटे
७. दिशा प्रतिष्ठान, लातूर – सोनू डागवाले
८. वंदे मातरम संघटना, पुणे – सचिन जामगे, वैभव वाघ
९. सेवांकुर, मुंबई – डॉ.नितीन गायकवाड
१०. सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान, सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग – डॉ.प्रवीणकुमार ठाकरे

शासकीय अधिकारी आणि व्यक्तिगत योगदान विभाग

१. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने
२. डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी पुणे
३. मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी सोलापूर
४. डॉ.राजेंद्र भारूड, तत्कालीन जिल्हाधिकारी, नंदूरबार
५. अमितेश कुमार, पोलिस आयुक्त नागपूर
६. गणेश देशमुख, महापालिका आयुक्त पनवेल
७. डॉ. प्रदीप आवटे,राज्य साथरोग सर्वेक्षण अधिकारी
८. डॉ. बंडू वामनराव रामटेके, वैद्यकीय अधिकारी चंद्रपूर
९. राजेश बाहेती, दुबईस्थित उद्योजक (पुणे)
१०. प्राचार्य अजय कौल, एकता मंच, अंधेरी मुंबई
११. प्यारे खान, नागपूर
१२. डॉ. संजय अंधारे, बार्शी
१३. डॉ. महादेवराव नरके, कोल्हापूर
१४. डॉ. मुन्नालाल गुप्ता, वर्धा
१५. डॉ. नमिता आनंद सोनी, औरंगाबाद
१६. डॉ.गौतम आणि मनीषा छाजेड, पुणे
१७. मंगेश चिवटे, ठाणे
१८. मधुकर कांबळे, परभणी
१९. करण गायकवाड, परभणी
२०. बाबासाहेब पिसोरे, दौलावडगाव, ता.आष्टी जि. बीड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: