Mumbai Rave Party: ‘त्या’ रात्री गोसावी व भानुशाली NCB कार्यालयात परत आले होते!; मलिक यांनी दिला पुरावा
हायलाइट्स:
- क्रूझवरील एनसीबीच्या कारवाईवर मंत्री मलिकांचं प्रश्नचिन्ह.
- दोन खासगी व्यक्तींच्या सहभागावर घेतला आक्षेप.
- २ ऑक्टोबरच्या रात्री उशिराचे दोन व्हिडिओ केले ट्वीट.
वाचा: ड्रग्ज पार्टी: मंत्री नवाब मलिक यांचा ‘तो’ आरोप एनसीबीने फेटाळला
मुंबईजवळ क्रूझवर करण्यात आलेली कारवाई फेक आहे. या कारवाईत कोणतेही ड्रग्ज क्रूझवर आढळलेले नाही, असा दावा मंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन केला. या कारवाईत खासगी व्यक्ती एनसीबी टीमसोबत होत्या. किरण पी. गोसावी आणि मनीष भानुशाली अशी त्यांची नावे असून ते त्याठिकाणी काय करत होते, असा सवाल मलिक यांनी विचारला आहे. कारवाईवेळी गोसावी हा आर्यन खान याला पकडून नेत असल्याचे तर मनीष भानुशाली हा अरबाज मर्चंट याला पकडून नेत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. हा अधिकार या दोघांना कुणी दिला, असा सवालही मलिक यांनी केला आहे. गोसावी हा स्वत:ला प्रायव्हेट डिटेक्टिव्ह म्हणवतो. त्याच्यावर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. तर भानुशाली हा भाजपचा कल्याणचा उपाध्यक्ष आहे, असा दावाही मलिक यांनी केला. मलिक यांचे हे सर्व आरोप एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी फेटाळले आहेत व हे दोघे पंच म्हणून हजर होते असे म्हटले आहे. त्यानंतर आता मलिक यांनी बुधवारी रात्री उशिरा गोसावी आणि भानुशालीचे दोन व्हिडिओ ट्वीट केले आहेत.
वाचा: ड्रग्ज पार्टी: अरबाजने मागितले ‘ते’ CCTV फुटेज; कोर्टाची NCBला नोटीस
एनसीबीने क्रूझवर छापा टाकला त्याच रात्री गोसावी आणि भानुशाली हे परत एनसीबी कार्यालयात आले होते व काही वेळाने एनसीबी कार्यालायातून निघाल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. एकाच इनोव्हा गाडीतून ( एमएच १२ जेजी ३०००) हे दोघे आले. कार्यालयात जात असताना दरवाजात त्यांना विचारणा करण्यात आली. त्यानंतर लगेचच त्यांना आत सोडले गेल्याचेही व्हिडिओत दिसत आहे. तिथे उपस्थित माध्यमांनी हे व्हिडिओ टिपले आहेत. इतक्या रात्री आपल्याला एनसीबीने का बोलावले होते, अशी विचारणा माध्यम प्रतिनिधींनी केली मात्र त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता ते तिथून निघाले.
वाचा:‘क्रूझवरील एनसीबीच्या छाप्यात खासगी लोक कसे’?; काँग्रेसला वेगळीच शंका