लॉकडाउनचे हाल संपेनात! रस्ते बंद असल्याने रुग्णाला खांद्यावर नेण्याची वेळ


हायलाइट्स:

  • अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गावांत कडकडीत लॉकडाउन
  • कडक लॉकडाउनचा गावातील लोकांना मोठा फटका
  • अनेक ठिकाणी रुग्णांना खांद्यावर घेऊन जाण्याची वेळ

अहमदनगर: मागील लॉकडाउनमध्ये (Lockdown) झालेले हाल अद्याप नागरिक विसरलेले नाहीत. त्यातच नगर जिल्ह्यात आता नव्याने लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे हाल होण्याची मालिका सुरूच राहिली आहे. त्यातही प्रशासनाच्या चुकीच्या आणि ताठर भूमिकेचा फटका बसत आहे. पारनेर (Parner) तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे गावात येणारे सर्व रस्ते बंद केल्याने वाहने येऊ शकत नाहीत. त्यामुळे रुग्णाला खांद्यावर घेऊन येण्याची वेळ परिसरातील ग्रामस्थांवर आली. हे चित्र पाहून आता गावातून संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे.

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर या मोठ्या गावातील हे चित्र आहे. रुग्णसंख्या वाढल्याने तेथे कडक लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. त्यासाठी गावात येणारे रस्तेही बंद करण्यात आले आहेत. मात्र, परिसरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि इतर खासगी रुग्णालये याच गावात आहेत. बाहेरून येणारी वाहने गावाबाहेरच अडविली जात आहेत. त्यामुळे वस्तीवरील लोकांना रुग्णांना खांद्यावर घेऊन यावे लागत आहे. गुरूवारी अशाच एका रुग्णाला खांद्यावरून नेते जात असतानाचे छायाचित्र व्हायरल झाले. त्यावरून गावातून संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामस्थांची तक्रार आहे की, रस्ते बंद करून तेथे पोलिस आणि अन्य सरकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या ताठर भूमिकेमुळे रुग्णांना घेऊन येणारी वाहनेही आत सोडली जात नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना रुग्णांना खांद्यावर घेऊन यावे लागत आहे.

वाचा: भाजपनं राष्ट्रीय कार्यकारिणीतून नारायण राणेंना का डावलले?

यासंबंधी टाकळी ढोकेश्वर गावातील व्यावसायिक संतोष सोनावळे म्हणाले, ‘वास्तविक पहाता प्रशासनाने चुकीचे निकष लावून लॉकडाउन केला आहे. गावठाणात रुग्ण नाहीत. जे रुग्ण मोजले ते परिसरात आणि वस्त्यांवर आहेत. तेवढा भाग बंद करणे आवश्यक असताना प्रशासनाने गावच बंद केले आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि व्यावसायिकांचे हाल होत आहेत.’

गावचे उपसरपंच सुनील चव्हणा यांनीही लॉकडाउन चुकीचा आणि अनावश्यक असल्याचे म्हटले आहे. ‘केवळ काही तरी कृती दिसावी, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यातून ग्रामस्थांचे हाल होत आहेत,’ असेही चव्हाण यांनी सांगितले.

वाचा: आजपासून ‘मिशन कवच कुंडल’; जाणून घ्या काय आहे ठाकरे सरकारचे लक्ष्य?

या गावांना कंटेन्मेंट झोनचे नियम लागू करण्यात आल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे रस्ते बंद करावे लागतात. मात्र, आपतकालीन परिस्थितीसाठी एक रस्ता मोकळा ठेवणे आणि तेथून रुग्णांना प्रवेश देण्याची सोय केली जाते. याची अंलबजावणी करताना गडबड झाल्याने रुग्णांवर ही वेळ ओढावली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रच बंद केलेल्या गावात अडकले असल्याने परिसरासाठी पर्यायी व्यवस्था, त्यासाठी रुग्णवाहिकेची सोय करणेही आवश्यक होते. मात्र, याकडेही यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. लोकप्रतिनिधींकडून यासंबंधी सोयीसुविधा करण्याकडे दुर्लक्षच झाल्याचे या चित्रावरून दिसून येते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: