बिटकॉइनची वाटचाल रेकॉर्डच्या दिशेने ; जाणून घ्या आज कितीने महागले डिजिटल करन्सी


हायलाइट्स:

  • जगभरातील क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे.
  • आज रविवारी बिटकॉइनसह प्रमुख क्रिप्टो करन्सीमध्ये वाढ झाली आहे.
  • आज बिटकॉइनचा भाव ५४४७५.२८ डॉलर झाला.

मुंबई : जगभरातील क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे. आज रविवारी बिटकॉइनसह प्रमुख क्रिप्टो करन्सीमध्ये वाढ झाली आहे. आज बिटकॉइनचा भाव ५४४७५.२८ डॉलर झाला. त्याचे एकूण बाजार भांडवल १०२७११८२१३९४९ डॉलर इतके वाढले.

सणासुदीत खाद्यतेल महागले; भाववाढ रोखण्यासाठी सरकारने उचलले हे पाऊल
आज रविवारी टॉप १० डिजिटल करन्सीपैकी ६ डिजिटल करन्सीच्या किमतीत वाढ झाली. इथेरियमचा भाव १.३० टक्क्यांनी घसरला. सोलाना, Binance Coin किमतीत घसरण झाली. बिटकॉइनच्या किमतीत मागील सात दिवसांत १४.२७ टक्के वाढ झाली आणि त्याचा भाव ५४४७५ डॉलरपर्यंत वाढला. यापूर्वी एप्रिल महिन्यात बिटकॉइनने ६५००० डॉलरचा विक्रमी पल्ला गाठला होता. त्याच दिशेने आता बिटकॉइनची वाटचाल सुरु आहे.

सणासुदीत सोने महागले ; जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव
आज इथेरियमच्या किमतीत १.३० टक्क्याची घट झाली. एका इथेरियमचा भाव ३५१४.१७ डॉलर इतका झाला. डोजेकॉइनचा भाव ०.२४ डॉलर असून त्यात ०.१४ टक्के वाढ झाली आहे.एका XRP चा भाव १.१५ डॉलर इतका आहे. त्यात ८.३२ टक्के वाढ झाली आहे. आज कार्डानोचा भाव २.२४ डॉलर इतका असून त्यात ०.२२ टक्के वाढ झाली आहे.

नियमित वेतन नसणाऱ्यांनाही मिळेल कर्ज; श्रीराम हाऊसिंग फायनान्सने आणली ‘ही’ योजना
पोलकॅडोटच्या एका कॉइनचा भाव ३७ डॉलर इतका वाढला आहे. त्यात ११ टक्के वाढ झाली. तिथेरचा भाव १ डॉलरवर स्थिर आहे. सोलानाच्या किमतीत आज २.५५ टक्के घट झाली असून त्याचा भाव १५४.०५ डॉलर झाला आहे. आज Binance Coin च्या किमतीत १.६१ टक्के घट झाली असून त्याचा भाव ४१४.१० डॉलर इतका झाला. जागतिक क्रिप्टो करन्सीजची उलाढाल २.२९ लाख कोटी डॉलर्स इतकी झाली आहे. यात बिटकॉइनचा जवळपास ४४.७१ टक्के वाटा आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: