मुंबई इंडियन्स घेणार मोठा निर्णय; या खेळाडूंना मिळणार डच्चू!


दुबई: आयपीएलच्या १४व्या हंगामात गतविजेत्या मुंबई इंडियन्सला साखळी फेरीत गारद व्हावे लागले. मुंबईला या वर्षी हॅटट्रिकची संधी होती. पण खराब कामगिरीमुळे ते प्ले ऑफमध्ये पोहोचू शकले नाहीत. मुंबईच्या या खराब कामगिरीचे मुख्य कारण म्हणजे मधळ्या फळीतील खेळाडूंचे फलंदाजीतील अपयश होय. आता आयपीएलच्या १५व्या हंगामासाठी मेगा लिलाव होणार आहे. या लिलावात मुंबई इंडियन्स काही मोठे निर्णय घेऊ शकते.

वाचा- ICCने केली मोठी घोषणा; या संघाला मिळणार १२ कोटी रुपये

आयपीएल २०२२ मध्ये ८ ऐवजी १० संघ असतील. यासाठी यावर्षी मेगा लिलाव होईल. या लिलावासाठीचे नियम अद्याप जाहीर झालेले नाहीत. पण प्रत्येक संघाला अधिक तर ३ खेळाडू कायम ठेवण्याची परवानगी मिळू शकते. जर असे झाले तर मुंबई इंडियन्स कोणत्या खेळाडूंना रिटेन करेल आणि कोणत्या खेळाडूंना रिलिझ करेल याचे उत्तर विरेंद्र सेहवागने दिले आहे.

वाचा- चेन्नई सुपर किंग्ज जिंकणार IPLचे विजेतेपद; हा मोठा फॅक्टर CSKच्या बाजूने

माजी सलामीवीर सेहवागच्या मते मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्मा, ईशान किशन आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंना रिटेन करले. तर हार्दिक पंड्या, उपकर्णधार कायरन पोलार्ड आणि सूर्यकुमार यादव यांना रिलिझ करू शकते. हार्दिकला दुखापतीमुळे निलालवात मोठी रक्कम मिळणार नाही. ईशान किशन अजून युवा आहे, त्यामुळे त्याला रिटेन केले जाईल. हार्दिक गोलंदाजी देखील करत नाही त्यामुळे त्याला मोठी रक्कम देऊन खरेदी करण्याआधी कोणताही संघ दोन वेळा विचार करेल. जर हार्दिक फिट झाला आणि त्याने गोलंदाजी करण्यास सुरुवात केली तर संघ त्याला मोठी बोली लावू शकतील. आयपीएलच्या १४व्या हंगामात हार्दिकने गोलंदाजी केली नाही. या मुद्दा भारतीय संघासाठी देखील काळजीचा आहे. आगामी वर्ल्डकपमध्ये जर त्याने गोलंदाजी केली नाही तर संघाचे संतुलन बिघडले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: