१३ वर्षीय काश्मिरी मुलीने रचला इतिहास; वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्यांदा फडकावला तिरंगा


नवी दिल्ली : १३ वर्षीय तजमुल इस्लामने (Tajmul Islam) किकबॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. बांदीपोरामधील रहिवासी असलेल्या तजमुलने कैरो येथे सुरू असलेल्या जागतिक चॅम्पियनशिपच्या १४ वर्षांखालील गटात हे सुवर्णपदक जिंकले. अंतिम सामन्यात तिने अर्जेंटिनाच्या लालिनाचा पराभव केला. त्यापूर्वी यजमान देशाच्या दोन दिग्गज बॉक्सर्सनाही तिने धूळ चारली होती.

वाचा-पराभवानंतर देखील भारतीय संघात बदल होणार नाहीत; न्यूझीलंडविरुद्ध हा असेल फॉर्म्युला

विजयानंतर तजमुलने ट्विट करून आनंद व्यक्त केला. तिने लिहिले आहे की, ‘माझ्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. कैरो येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मी १४ वर्षांखालील गटात सुवर्णपदक जिंकले. आता मी दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनले आहे.’ याआधी २०१६ मध्ये वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी किक बॉक्सिंगमध्ये तिने पहिले विश्वविजेतेपद पटकावले होते. अशी कामगिरी करणारी ती पहिली ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन होती.

वाचा-watch video : अफगाणिस्तानने पाकिस्तानचा जवळ जवळ पराभव केला होता, पण…

वाचा-कोहलीनंतर पाकिस्तानी पत्रकाराचा या कर्णधाराला बेताल सवाल; खेळाडू परिषदेतून उठून गेला

तजमुलने दुसऱ्यांदा फडकावला तिरंगा
बांदीपोरा येथील आर्मी स्कूलमध्ये शिकत असलेल्या तजमुलने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, “चॅम्पियनशिप १८ ऑक्टोबरला सुरू झाली आणि २४ ऑक्टोबरला संपली. मी २२ ऑक्टोबरला माझा अंतिम सामना खेळला. या जागतिक स्पर्धेत भारतातून ३० खेळाडूंनी वेगवेगळ्या प्रकारात भाग घेतला होता. तजमुलच्या या यशाबद्दल जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांनी तिचे अभिनंदन केले आहे.

वाचा- दिग्गज खेळाडूकडून झाली मोठी चूक; १ चेंडूवर दिल्या १० धावा

तजमुल चालवते स्वतःची अॅकॅडमी
तजमुल इस्लाम बांदीपोरा येथील तारकापुरामधील रहिवासी आहे. तिला चार भावंडे आहेत. तजमुलचे वडील घर चालवण्यासाठी ड्रायव्हिंगचे काम करतात. १३ वर्षांची तजमुल बांदीपोरा येथे स्वतःची अकादमी देखील चालवते. या अॅकॅडमीमध्ये ती इतर मुलींना प्रशिक्षण देते. तिने अनेक राज्य, जिल्हा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके पटकावली आहेत. इयत्ता सातवीत शिकणाऱ्या तजमुलचे ऑर्थोपेडिक सर्जन होण्याचे स्वप्न आहे. ती म्हणाली, ‘मला लोकांची हाडं मोडायची आहेत आणि जोडायचीही आहेत. मला हाडांचे डॉक्टर बनायचे आहे.’ तजमुल काश्मीरमधील ‘बेटी बढ़ाओ, बेटी बचाओ’ची ब्रँड अॅम्बेसेडर देखील आहे. ती म्हणाली, ‘माझ्या आईने मला नेहमीच प्रेरणा दिली आहे. मला किक बॉक्सिंग शिकविण्यासाठी तिने माझ्या वडिलांना राजी केलं होतं. मुलीनं मिळविलेल्या यशामुळे तजमुलचे आई-वडील दोघेही खूप आनंदित आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: