पंढरपूर विठ्ठल मंदिरात हिंदीत भाषेत पुजा केल्याच्या व्हायरल तक्रार व प्रसार माध्यमांत येत असलेल्या बातम्यांबाबत
भाविकांना पुजेची माहिती व पुजेच्या अनुषंगाने सुचना प्राधान्याने मराठी व आवश्यक भासल्यास हिंदी भाषेतूनही देण्यात येतात
मात्र पुजेचे मंत्र हे मराठी व संस्कृत भाषेतून पठण करण्यात येतात यामध्ये इतर कोणत्याही भाषेचा वापर करण्यात येत नाही-कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.10:- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने भाविकांना श्रींच्या विविध प्रकारच्या पुजा उपलब्ध करून देण्यात येतात.त्यामध्ये श्रींच्या तुळशी पुजेचा समावेश आहे.सदर पुजा बुकींगसाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून ही पुजा देशभरातील भाविक घरबसल्या बुकींग करून पुजेसाठी येत असतात.या भाविकांना पुजेची माहिती व पुजेच्या अनुषंगाने सुचना प्राधान्याने मराठी व आवश्यक भासल्यास हिंदी भाषेतूनही देण्यात येतात मात्र पुजेचे मंत्र हे मराठी व संस्कृत भाषेतून पठण करण्यात येतात.यामध्ये पूजा करण्यासाठी इतर कोणत्याही भाषेचा वापर करण्यात येत नाही.

सदरच्या तुळशी पुजेवेळी श्री संत तुकाराम भवन येथे आचमन करून व संकल्प करण्यात येतो.त्यानंतर श्री गणपतीचे स्मरण, श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे स्मरण व विष्णू सहस्त्रनाम पठण करून पुजा करण्यात येते. यासाठी मराठी व संस्कृत भाषेचा वापर करण्यात येतो.तथापि पुजेसंबंधी माहिती सर्व भाविकांना व्हावी या उद्देशाने प्राधान्याने मराठी व आवश्यकता भासल्यास हिंदी व इतर भाषेतून माहिती देण्यात येते.
राहूल सातपुते या भाविकाने केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली असून संबंधितांना आवश्यक त्या सुचना देण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
