स्वेरीमधील शिस्त म्हणजे करिअरची खात्री : डी. फार्मसीतील पालक मेळाव्यात सतीश दिक्षित यांचे प्रतिपादन

स्वेरी sveri मधील शिस्त म्हणजे करिअरची खात्री : डी.फार्मसी D PHARMACY तील पालक मेळाव्यात सतीश दिक्षित यांचे प्रतिपादन

स्वेरीज् डी.फार्मसीमध्ये पालक – विद्यार्थी संवाद : दर्जेदार शिक्षण व सुरक्षिततेचा विश्वास अधिक दृढ Pandharpur Education News:

पंढरपूर येथील स्वेरीज् डी.फार्मसीमध्ये पालक मेळावा संपन्न.शिस्त,सुविधा व सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांचे करिअर घडते : पालकांचे मत.

Pandharpur sveri news : पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज : स्वेरी हे नावच आज शिक्षण क्षेत्रात विश्वासाचे प्रतीक बनले असून गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्तबद्ध वातावरण आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांचे करिअर घडते, असे प्रतिपादन पालक प्रतिनिधी सतीश दिक्षित यांनी केले.

गोपाळपूर ता.पंढरपूर येथील स्वेरी तथा श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित डिप्लोमा फार्मसी (D. Pharmacy) मध्ये प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी आयोजित पालक मेळावा कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

गुणवत्तेवर भर देणारी स्वेरीची शैक्षणिक परंपरा

स्वेरीचे संस्थापक डॉ.बी.पी.रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली आणि प्राचार्य प्रा.सतीश मांडवे यांच्या नेतृत्वाखाली स्वेरी शिक्षणसंस्था कार्यरत आहे.वसतिगृह, वर्गातील अध्यापन, अभ्यासाचे नियोजन आणि करिअरसाठी आवश्यक सर्व बाबींमध्ये स्वेरी कोणतीही तडजोड करत नसल्याचे सतीश दिक्षित यांनी स्पष्ट केले.स्वेरीतील शिस्त म्हणजे विद्यार्थ्यांचे करिअर नक्कीच मस्त,असेही त्यांनी नमूद केले.

डी.फार्मसी अभ्यासक्रम व अत्याधुनिक सुविधा

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा.सौरभ कौलगी यांनी डी. फार्मसी अभ्यासक्रमा बाबत सविस्तर माहिती देताना – महाविद्यालयात उपलब्ध सुसज्ज ग्रंथालय व वाचनालय,रात्र अभ्यासिका वर्ग,१०२४ एमबीपीएस क्षमतेचे वाय-फाय इंटरनेट, सोलार रूफटॉप पॉवर प्लांट,खेळाचे मैदान व जिमखाना,विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वसतिगृह सुविधा, वाहतुकीसाठी बस सुविधा,अभ्यासक्रम व स्पर्धा परीक्षांसाठी संदर्भ पुस्तके,औषधनिर्मिती प्रक्रिया समजण्यासाठी इंडस्ट्रियल व्हिजिट अशी माहिती पालकांना दिली.

पालक प्रतिनिधींचे मार्गदर्शन

पालक प्रतिनिधी अतुल मोरे यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे काटेकोर नियोजन करून सातत्य राखल्यास यश निश्चित मिळते,असे सांगितले.अपयश आल्यास खचून न जाता अधिक जोमाने प्रयत्न करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

महिला पालक प्रतिनिधी शुभांगी जाधव यांनी स्वेरीतून मुलींच्या शिक्षणासाठी घेतली जाणारी काळजी,सुरक्षिततेची हमी आणि पालक महाविद्यालय यांच्यातील संवाद याबाबत समाधान व्यक्त केले.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,प्रश्नोत्तर सत्र

यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.पालकांनी विविध शैक्षणिक विषयांवर प्रश्न विचारले. त्यापैकी अनेक प्रश्नांना प्रा.कौलगी यांनी तत्काळ उत्तरे दिली तर काही प्रश्न वरिष्ठ पातळीवर सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले.

या पालक मेळाव्यास सोलापूर जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यांतील सुमारे २०० पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ईशा शेटे व प्रा.रेश्मा जगताप यांनी केले.आभार प्रदर्शन प्रा.नितल दांडगे यांनी केले.

Leave a Reply

Back To Top