सांगली जिल्हा बँक निवडणुकीबाबत भाजपने केली मोठी घोषणा


हायलाइट्स:

  • सांगलीत राजकीय हालचालींना वेग
  • भाजपने घेतला स्वबळावर लढण्याचा निर्णय
  • जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांची घोषणा

सांगली : सांगली जिल्हा बँक निवडणूक जवळ आल्याने राजकीय हालचाली आता वेगवान झाल्या आहेत. भाजपने ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी आज याची घोषणा केली.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी महाविकास आघाडीच्या पॅनेलद्वारे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सांगली जिल्हा बँकेत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक रंगणार आहे.

ऐन दिवाळीत एफडीएने कोल्हापुरात केलेल्या कारवाईमुळे खळबळ; पाहा काय घडलं!

सांगली जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महाविकास आघाडीसह भाजपकडून प्रयत्न सुरू होते. मात्र जागावाटपाबाबत समाधान न झाल्याने अखेर महाविकास आघाडीतील पक्षांनी आघाडीच्या वतीने एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपच्या नेत्यांनी निवडणुकीची रणनीती निश्‍चित करण्यासाठी बुधवारी कोअर कमिटीची बैठक आयोजित केली होती.

दिवाळीच्या पूर्वसंध्येला ‘अशी’ आहे राज्यातील करोनाची स्थिती! १,१९३ नव्या रुग्णांचे निदान

या बैठकीत स्वबळावर लढण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी स्वबळाचा निर्णय जाहीर केला. भाजपच्या स्वबळाच्या निर्णयानंतर सांगली जिल्हा बँकेत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, गोपीचंद पडळकर, माजी आमदार विलासराव जगताप, दिनकर पाटील, राजेंद्र देशमुख उपस्थित होते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: