महाराष्ट्र विधान परिषद उपसभापतींच्या उपस्थितीत कसबा गणपती मंदिरात महाआरती व मंदिर परिसरात गुढीपाडवा उत्सव संपन्न
पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,३० मार्च : महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत आज पुण्यातील श्री कसबा गणपती मंदिरात महाआरती आणि मंदिर परिसरात गुढीपाडवा उत्सव उत्साहात पार पडला. यावेळी डॉ.नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्राच्या समृद्धी आणि जनकल्याणासाठी प्रार्थना केली.

यानंतर शिवसेना पक्षाच्या वतीने कसबा गणपती मंदिर परिसरात पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली ज्यात मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि नागरिक सहभागी झाले होते.हा सोहळा भक्तिभावाने आणि आनंदमय वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाला बाळासाहेब मालुसरे,आनंद गोयल,नितीन पवार यांच्यासह शिवसेना संपर्कप्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत, कार्यालयीन प्रमुख सुधीर जोशी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

गुढीपाडवा हा विजय, समृद्धी आणि नव्या वर्षाच्या शुभारंभाचे प्रतीक मानला जातो. या निमित्ताने पारंपरिक संस्कृतीचा गौरव करण्यात आला.उपस्थित नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत उत्साहात गुढीपाडव्या चा आनंद साजरा केला.

