सध्याच्या धकाधकीच्या जीवनात योगासनाला अनन्यसाधारण महत्व : प्रांताधिकारी सचिन इथापे

भारत विकास परिषद व श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायम संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०६/२०२४: सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यायाम, संतुलित आहार याने शाररीक तंदुरुस्त राहता येते मात्र योगासने केल्याने शाररीक आणि मानसिक तंदुरुस्त राहता येते.त्यामुळे योगासनला अनन्यसाधारण महत्व आहे असे प्रतिपादन पंढरपुरचे प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सचिन इथापे यांनी केले.

स्वयंसेवी संघटनेचा हा उपक्रम स्तुत्य असून समाजोपयोगी उपक्रम राबवावेत असे पालिकेचे मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांनी सांगितले.

पंढरपूर येथील भारत विकास परिषद आणि श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायम संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने योग भवन येथे आंतर राष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. विविध योग आणि त्याचे महत्व यावेळी सांगण्यात आले.

येथील श्री विठ्ठल रुक्मिणी योग संस्थेच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सचिन इथापे,नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव आणि दोन्ही स्वयंसेवी संस्थेची पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक उपस्थित होते. या दिनाचे औचित्य साधून आहार ,विहार आणि व्यायाम या अनुषंगाने विविध योगासने करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरवात वंदेमातरम ने झाली.

भारत विकास परिषदेचे अध्यक्ष मंदार लोहोकरे यांनी आपल्या प्रास्ताविकात भारत विकास परिषदेची स्थापना १९६३ साली झाली. संपर्क ,सहयोग,संस्कार, सेवा आणि समर्पण या पंच सूत्रीवर काम करीत आहेत. या आधी मतदान जनजागृती,रेल्वे विभागा मार्फत देशी वृक्षारोपण कार्यक्रम झाल्याचे सांगितले.

त्यानंतर योगाचार्य सर्वश्री डॉ ज्योती गवळी, अनिल पवार आणि अजित कुलकर्णी यांनी उपस्थितांना योगासने आणि माहिती दिली.

योग शिबिराची सुरवात प्रार्थनेने झाली. त्या नंतर विविध आसने प्रात्यक्षिका सहित साधकांकडून करून घेण्यात आली. प्राणायाम सत्रात अनुलोम विलोम,भ्रामरी, ओंकार गुंजन घेण्यात आले. योग सत्राची सांगता ही शांती पाठाने झाली.मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.

श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायम संस्थेचे अध्यक्ष ॲड सुनील वाळूजकर यांनी आपल्या मनोगतामध्ये जागतिक योग दिनाचे महत्त्व सांगून 21 जून 2015 रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक योग दिनाची सुरुवात करण्यात आली.पंढरपूर शहरातील सर्व स्तरातील नागरिकांच्या माध्यमातून स्वनिधीमधून भव्य योगभवन बांधले असून या ठिकाणी शहरातील नागरिकांसाठी मोफत योग सराव वर्ग चालवला जातो तसेच या संस्थेच्या माध्यमातून अनेक आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण व इतर सामाजिक उपक्रम राबवीत आहोत.या जागेत इनर व्हील क्लबच्या माध्यमातून ओपन जिम केले आहे तसेच या ठिकाणी खुल्या वातावरणात विविध कार्यक्रम व्हावेत म्हणून भव्य सांस्कृतिक भवन उभारले असल्याचे सांगितले.

या वेळी श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायाम संस्थेचे अध्यक्ष ॲड सुनिल वाळूजकर,सचिव प्रशांत आगावणे,उपाध्यक्ष रवींद्र कोडग, अँड.रामलिंग कोष्टी, निस्सार शेख,आर बी जाधव, जयंत हरिदास, कांतीलाल सुपेकर तर भारत विकास परिषदेचे मंदार लोहोकरे, अनिल पवार, अजित कुलकर्णी,डॉ सुरेंद्र काणे,डॉ वर्षा काणे, मिलिंद वाघ ,रोहिणी कोर्टीकर,सीमा कुलकर्णी, स्वानंदी काणे आदी सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नीलम माळी यांनी केले.आभार अनिल पवार यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading