मंगळवेढा पंचायत समिती गटविकास अधिकारी पदाचा कार्यभार डॉ.जास्मिन शेख यांनी स्विकारला
सर्वसामान्य जनतेच्या कामांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल- डॉ.जास्मिन शेख
मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी : मंगळवेढा पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी डॉ.जास्मिन शेख यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला आहे.यावेळी प्रसार माध्यामांशी बोलताना त्या म्हणाल्या, सर्वसामान्य जनतेच्या कामांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

विद्यमान गटविकास अधिकारी योगेश कदम यांची बदली नुकतीच खटाव येथे झाली असून येथूनच गटविकास अधिकारी डॉ.जास्मिन शेख यांची बदली मंगळवेढा पंचायत समितीकडे झाली आहे. नुकताच त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारुन कामांना गती देण्याच्या कर्मचार्यांना सुचना दिल्या.
डॉ.जास्मिन शेख या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परिक्षेत त्या 2013 साली नियुक्ती होवून प्रथम रायगड येथे ट्रेनिंग पुर्ण केले.त्यानंतर धाराशिव, अमरावती, उत्तर सोलापूर व खटाव येथे त्यांनी आत्तापर्यंत सेवा बजावली आहे. करमाळा येथील गटविकास अधिकारी श्री.शेख यांच्या त्या पत्नी होत.