श्री गजानन महाराज पालखीच्या आगमनानिमित्त श्री सिध्देश्वर मंदिर परिसर केला स्वच्छ

श्री गजानन महाराज पालखीच्या आगमनानिमित्त श्री सिध्देश्वर मंदिर परिसर केला स्वच्छ

मंगळवेढा /ज्ञानप्रवाह प्रतिनिधी – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा येथून श्री गजानन महाराज यांची पालखी मंगळवेढा तालुक्यात प्रवेश करणार असल्याने तिर्थक्षेत्र माचणूर येथे नुतन गटविकास अधिकारी डॉ.जास्मिन शेख यांनी प्रत्यक्ष भेट घेवून परिसर स्वच्छता मोहिम हाती घेतली.

दि. 6 जुलै रोजी पंढरपूर येथे आषाढी वारी भरत असल्याने त्यासाठी बुलढाणा येथून प्रतीवर्षी प्रमाणे यंदाही श्री गजानन महाराज पालखीचे आगमन तिर्थक्षेत्र माचणूर येथे होत असल्याने गटविकास अधिकारी डॉ. जास्मिन शेख यांनी शुक्रवार दि.27 रोजी या परिसराची पाहणी करुन स्वच्छता मोहिम हाती घेवून सर्वत्र पडलेला कचरा गोळा करुन तो नष्ट केल्याने परिसर एकदम स्वच्छ बनला आहे.

तिर्थक्षेत्र माचणूर येथे श्री गजानन महाराज पालखी आगमनाच्या निमित्ताने परिसर स्वच्छता करताना गटविकास अधिकारी डॉ.जास्मिन शेख,उपसरपंच नितीन पाटील दिलीप कलुबर्मे व अन्य ग्रामस्थ (छाया-शिवाजी पुजारी,मंगळवेढा)

यंदा पाऊस लवकर पडल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला गवत मोठ्या प्रमाणात वाढल्याने या गवताला नष्ट करण्यासाठी तणनाशक फवारणी करण्यात आली. दिंडीमधील वारकर्‍यांची स्नानाची व शौचालयाची गैरसोय होवू नये यासाठी फिरते शौचालय तसेच पाण्याची,लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे.पावसाचे दिवस असल्याने रोगराई पसरु नये यासाठी परिसरात बीएससी पावडर टाकण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

या स्वच्छता मोहिमेत प्रत्यक्ष गटविकास अधिकारी डॉ. जास्मिन शेख,ग्रामसेविका माने,उपसरपंच नितीन पाटील, दिलीप कलुबर्मे,संतोष कलुबर्मे,सलिम शेख यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Leave a Reply

Back To Top