दर्शनरांगेतील भाविकांसाठी गोपाळपूर येथे दोन जर्मन हॅगरची उपलब्धता-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

दर्शनरांगेतील भाविकांसाठी गोपाळपूर येथे दोन जर्मन हॅगरची उपलब्धता-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

भाविकांना पददर्शन रांगेत जाण्यासाठी पाच कि.मी.चे अंतर होणार कमी

मंदिर समितीकडून जर्मनी हँगरची सुविधा

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज, दि.20 :- आषाढी यात्रा सोहळा दि. ०६ जुलै २०२५ रोजी संपन्न होत आहे.आषाढी यात्रा सोहळ्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तसेच अन्य पालखी सोहळ्यांचे पंढरपूर तालुक्यात आगमन झाले आहे.श्री.विठ्ठल रुक्मिणी च्या पदस्पर्श दर्शना साठी भाविकांची दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात गर्दी असून दर्शनरांग गोपाळपूर पर्यंत गेली आहे.पद दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दर्शनरांगेत येण्यासाठी फार लांब जावे लागू नये यासाठी गोपाळपूर हद्दीत मंदिर समिती कडून सर्व सुविधायुक्त दोन जर्मन हँगरची उपलब्धता केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

पद दर्शन रांगेतील भाविकांना सुलभ व जलद दर्शन व्हावे तसेच पददर्शन रांगेसाठी जास्त लांब चालत जाता येऊ नये यासाठी गोपाळपूर येथे जर्मन हँगर उभा करण्यासाठी खाजगी मालकीचे अडीच एकर घेण्यात आले असून या ठिकाणी जर्मन हँगर उभा करण्याचे काम सुरू आहे.पददर्शन रांग या ठिकाणाहून सुरू केल्यास जवळपास तीन किलो मीटरपर्यंतचे दर्शन रांग यामध्ये राहील तसेच आसरा हॉटेल जवळपास एक जर्मन हँगर तयार झाला असून दोन किलोमीटर पर्यंतची दर्शन रांग यामध्ये राहील.पददर्शन रांगेतील भाविकांसाठी दोन जर्मन हँगरची उपलब्धता केल्याने भाविकांना पददर्शन रांगेत जाण्यासाठी पाच कि.मी.चे अंतर कमी होणार आहे.या ठिकाणी भाविकांना सुरक्षा स्वच्छ पिण्याचे पाणी सुलभ शौचालय आदी आवश्यक सुविधा मंदिर समितीकडून उपलब्ध करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

गोपाळपूर -रांझणी रोड वरील दर्शन रांगेत लाईट नसल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दि.3 जुलै रोजी रात्री 12.30 वाजता भेट देऊन संबंधित यंत्रणेना सूचना दिल्या व त्या ठिकाणी तात्काळ प्रकाश व्यवस्था तसेच सुरक्षा रक्षकांची नेमणूक देखील करण्यात आली.यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top