एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या ?

एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या ?

पंढरपूर /शुभम लिगाडे : पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे कौटुंबिक वादातून पत्नीने मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली तर ही आत्महत्येची घटना घडल्यानंतर दुसर्या दिवशी पती म्हमांजी शहाजी आसबे यानेही आत्महत्या केली आहे.

आषाढी एकादशी दिवशी मोनाली व त्यांचे पती म्हमांजी शहाजी आसबे रा.कासेगाव, ता.पंढरपूर यांच्यात वाद झाला होता.त्यानंतर म्हमांजी बाहेर निघून गेला होता मात्र पत्नी मोनाली यांनी मुलगी ईश्वरी वय वर्षे ५ व मुलगा कार्तिक वय वर्षे ३ यांच्यासह त्यांच्याच शेतातील विहिरीत उडी मारली. काही वेळाने म्हमांजी आल्यानंतर त्यांनी या सर्वांचा शोध सुरू केला. मात्र त्यांना ते मिळून आले नाहीत. काही वेळाने त्यांनी विहीरीच्या बाजूला पाहिले असता त्यांना लहान मुलांच्या चपला विहीरीच्या पाण्यात तरंगत असल्याच्या दिसून आल्या. तोपर्यंत ग्रामस्थ त्या ठिकाणी गोळा झाले होते.विहिरीत त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते परंतु विहीरीत पाणी जास्त होते.

तोपर्यंत या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलिस घटनास्थळी दाखल झाले.कासेगाव येथील शेतात जाऊन विहिरीतून मोनाली आणि तिच्या दोन बालकांचे मृतदेह बाहेर काढले.

विहिरीत सुमारे साठ फूट पाणी होते. मोटारींच्या सहाय्याने पाणी उपसण्याचे आल्यानंतर २० फूट पाणी शिल्लक राहिल्या नंतर शिरोळ जि.कोल्हापूर वजीर रेस्क्यू पथकातील रवूफ पटेल,दशरथ शिखलकर, शिवा सोनार, रेवणसिद्ध चंदनशिवे यांना बोलवण्यात आले होते.हे वजीर रेस्क्यू पथकातील सहकारी दोरीच्या साहाय्याने विहिरीत उतरून त्यांनी तिघांचेही मृतदेह शोथून बाहेर काढले.

Leave a Reply

Back To Top