महसूल सप्ताहानिमित्त पंढरपूर तालुक्यात वृक्षारोपण

महसूल सप्ताह निमित्त पंढरपूर तालुक्यात वृक्षारोपण

पंढरपूर,दि.०३:-महसूल सप्ताह निमित्त दि.3 ऑगस्ट रोजी पंढरपूर तालुक्यात तहसीलदार सचिन लंगुटे ,गटविकास अधिकारी सुशील संसारे यांच्या हस्ते पाणंद रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली.

यावेळी लोणारवाडीचे मंडल अधिकारी, तलाठी,ग्रामसेवक, माजी सरपंच व ग्रामस्थ, ग्रामरोजगार सेवक,नरेगा तांत्रिक अधिकारी, अव्वल कारकून आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

वृक्ष रोपण केल्यानंतर त्या रोपांचे संगोपन करण्याच्या सूचना तहसीलदार सचिन लंगुटे व गटविकास अधिकारी सुशिल संसारे यांनी दिल्या.

करकंब,भोसे,जळोली,रांजणी येथे सरपंच, मंडल अधिकारी, तलाठी,कृषी सहाय्यक ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक व ग्रामस्थ यांच्या हस्ते महसूल सप्ताह निमित्त तहसीलदार यांच्या सूचनेनुसार पाणंद रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली.

Leave a Reply

Back To Top