पंढरपूरात तिरंगा बाईक रॅलीतून देशभक्तीचा जागर
तालुका प्रशासनाकडून आयोजन नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग

पंढरपूर,दि.14 : नागरिकांमध्ये राष्ट्राभिमान, देशभक्ती निर्माण व्हावी तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या ज्वाजल्य इतिहासाचे सर्व नागरिकांना स्मरण व्हावे या उद्देशाने शासनामार्फत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे.तिरंगा हा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचे प्रतीक असल्याने पंढरपूर तालुका प्रशासनाच्यावतीने शहरातून तिरंगा बाईक रॅली काढून देशभक्तीचा जागर करण्यात आला.

यावेळी आमदार समाधान आवताडे, प्रांताधिकारी सचिन इथापे,तहसिलदार सचिन लंगुटे यांनी हिरवी झेंडी दाखवून तिरंगा रॅलीला रवाना केले.छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरु झालेली सदर तिरंगा बाईक रॅली चौफाळा – नाथ चौक – तांबडा मारुती – महाद्वार – कालिका माता मंदिर – काळा मारुती चौफाळा मार्गे येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समारोप झाला.यावेळी रॅलीत विविध देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या.

या रॅलीमध्ये आमदार समाधान आवताडे, प्रांताधिकारी सचिन इथापे,तहसिलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशिल संसारे,मुख्याधिकारी महेश रोकडे,शहर पोलीस निरिक्षक विश्वजीत घोडके,तालुका पोलीस निरिक्षक टी.वाय.मुजावर तसेच विविध विभागाचे अधिकारी,कर्मचारी आणि मान्यवर पदाधिकारी व नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.
