रूक्मिणी मातेस पारंपारिक पंखा पोशाखासह अलंकार परिधान

रूक्मिणी मातेस पारंपारिक पंखा पोशाखासह अलंकार परिधान

श्री विठ्ठलास पारंपारिक पोशाख परिधान करण्यात आला

पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,ता.4- घटस्थापनेपासून नवरात्र महोत्सवास सुरुवात झालेली आहे, माता रुक्मिणीला पंखा पोषाखासह पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली.

श्री विठ्ठलास पारंपारिक पोशाख परिधान करण्यात आलेला आहे. 

तसेच रुक्मिणी मातेस सोने मुकुट, मोठी नथ, कर्णफुले जोड, मन्यामोत्याच्या पाटल्या जोड, चंद्र, सोन्या मोत्याच्या तानवड जोड, खड्यांची वेणी, मोत्याच्या तुरा, पाण्याड्याचा हार, चिंचपेटी हिरवी, खड्यांची बिंदी, बाजीराव गरसोळी, नवरत्नाचा हार, जडावाचा हार, वाक्या जोड, पुतळ्यांची माळ, रूळ जोड, पैंजण जोड, ठुशी , दशावतारी हार, इत्यादि पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

Leave a Reply

Back To Top