यंदाची निवडणूक देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यंदाची निवडणूक देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकास पुरूष नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी ही निवडणूक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज, ता.१६- यंदाची निवडणूक देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असून विकास पुरूष नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे.नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्या साठी भाजपा उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा.विकसित भारताचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी नरेंद्र मोदींच्या पारड्यात मोठ्या संख्येने मतांचे दान टाका, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.एनडीए म्हणजे विकासाच्या गाडीचे पॉवरफुल इंजिन असून त्याला आमच्या घटक पक्षांचे डबे जोडले गेले आहेत.या प्रत्येक डब्यात दुर्बल,वंचित,आदिवासी, शेतकरी , अल्पसंख्याक, महिला या सर्वांसाठी जागा आहे.याउलट विरोधकांकडे २६ पक्ष असून प्रत्येक नेता स्वतःलाच इंजिन समजतो त्यामुळेच त्यांच्या इंजिनाला डबेच नसल्याने त्यात सर्वसामान्यांना जागाच नाही, त्या इंजिनात केवळ त्यांचाच परिवार बसणार असल्याची खोचक टिप्पणी त्यांनी मंगळवारी सोलापूर येथे केली.

सोलापूर मतदारसंघातील भाजपा- महायुतीचे उमेदवार आ.राम सातपुते व माढा मतदारसंघातील उमेदवार खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना झालेल्या सभेत फडणवीस बोलत होते. यावेळी खा.जयसिद्धेश्वर महास्वामी,आ.सुभाष देशमुख, आ.विजयकुमार देशमुख,माढ्याचे आ.बबनदादा शिंदे, माणचे आ.जयकुमार गोरे,अक्कलकोटचे आ.सचिन कल्याणशेट्टी, करमाळ्याचे आ.संजय शिंदे, पंढरपूर मंगळवेढ्याचे आ. समाधान आवताडे, आ यशवंत माने, सांगोल्याचे आ. शहाजी बापू पाटील, विधान परिषद माजी आ.प्रशांत परिचारक आदी मंचावर उपस्थित होते.

पुढे बोलताना फडणवीस यांनी मोदी सरकारच्या मागच्या १० वर्षातील विकास योजनांची माहिती सादर केली. गेल्या १० वर्षांत देशाची अर्थव्यवस्था मोदी सरकारमुळे जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था बनली आहे.अर्थव्यवस्था मजबूत असेल तरच पायाभूत सुविधा विकास आणि विशेषत्वाने गरीब,कल्याणाचा अजेंडा प्रभावीपणे राबवता येतो, असे फडणवीस म्हणाले. काँग्रेसच्या काळात पायाभूत सुविधांसाठी केवळ एक लाख कोटी खर्च व्हायचा मात्र मोदी सरकारच्या काळात १३ लाख कोटी खर्च करून सर्वांगीण विकास साधला जात असल्याचे सांगितले.

भ्रष्टाचाराला पायबंद घालून गोरगरीबांचा हक्काचा पैसा त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा असेल तर खा.रणजितसिंह निंबाळकर व आ. राम सातपुते या महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन भाजपचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *