शिवसेना प्रणित को-ऑप बँक एम्प्लॉईज युनियन व सहकार सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ सहकार परिषद
सहकारी बँका,पतसंस्था व महिला बचत गट यांसाठी मार्गदर्शन सत्र आणि सन्मान सोहळा

मुंबई – शिवसेना प्रणित को-ऑप बँक एम्प्लॉईज युनियन व सहकार सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ सहकार परिषद सहकारी बँका,पतसंस्था व महिला बचत गट यांसाठी मार्गदर्शन सत्र आणि सन्मान सोहळा मुंबई येथे पार पडला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांची मुख्य उपस्थिती होती.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित करत महाराष्ट्राच्या सहकार चळवळीबद्दल भाष्य केले. त्यांनी महाराष्ट्रातील सहकार चळवळ ही देशातील सर्वांत प्रभावी आणि यशस्वी चळवळ असल्याचे मत व्यक्त केले.
शेतकऱ्यांना समृद्ध करणारं असं सहकार क्षेत्र आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२१ मध्ये स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन केलं. त्यामुळे सहकार क्षेत्राला नवसंजीवनी मिळतेय. महाराष्ट्रात सव्वा दोन लाख सहकारी संस्था कार्यरत असून सहा ते सात कोटी लोक या संस्थांशी जोडलेले आहेत,असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावेळी महिला बचत गटांसाठी सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना आणि त्यामुळे महिला सक्षमीकरणाला मिळालेले बळ याविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला.

यावेळी को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई आणि सहकार सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराव अडसूळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे,आमदार प्रवीण दरेकर,शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ तसेच संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते.