अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थ वाहतुक करणाऱ्या आरोपीवर कारवाई

अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थाची वाहतुक करणाऱ्या आरोपीवर कारवाई

एकुण ३३,००,०००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त वाडा पोलीसांची कारवाई

पालघर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४/१०/२०२५- पोलीस अधिक्षक यतिश देशमुख पालघर यांनी पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना सक्त सुचना दिलेल्या आहेत.

दिनांक २३/१०/२०२५ रोजी रात्री वाडा पोलीस ठाणे पथक हे हद्दीमध्ये खंडेश्वरी नाका येथे पेट्रोलींग दरम्यान वाहने चेक करत असताना सकाळी ०६.०० वाजताचे सुमारास संशयित वाहन क्र.MH11-AL-1428 यावरील चालक यास नाव पत्ता विचारला असता त्याने आपले नाव मोहम्मद नसिरुद्दीन अन्सारी, वय ३७ वर्षे, रा.आमरा भर्खर,ता.डुमरी,जि. गिरीडीह,झारखंड असे सांगितले.

नमूद वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला एकुण १८,००,०००/-रुपये किंमतीचा तंबाखुजन्य पदार्थ मिळूण आला. त्यामुळे आरोपीकडून वाहनासह एकूण ३३०००००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.नमूद आरोपींविरुध्द वाडा पोलीस ठाणे येथे ४२३/२०२५ भारतीय न्याय संहीताचे कलम १२३,२२३,२७५ सह अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ नियम २०११ चे कलम २६ (२), २७,२३,,२६ (२), (आय व्हि.) ३० (२), (ए) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीस अटक केली असून पुढील तपास हा पोनि/दत्तात्रय किंद्रे,पोउपनि/श्री मुंढे नेम. वाडा पोलीस ठाणे हे करत आहेत.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक यतिश देशमुख पालघर,अपर पोलीस अधिक्षक विनायक नरळे पालघर, उपविभागीय पोलीस अधिकारी समिर मेहेर जव्हार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोनि/दत्तात्रेय किंद्रे प्रभारी अधिकारी वाडा पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

Leave a Reply

Back To Top