नितीश कुमारच पुन्हा बहुमताने बिहार चे मुख्यमंत्री होतील- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले


बिहार विधानसभा निवडणुकीत सर्व जागांवर रिपब्लिकन पक्षाचा एनडीए ला पाठिंबा

बिहार विधानसभा निवडणुकीत सर्व जागांवर रिपब्लिकन पक्षाचा एनडीए ला पाठिंबा-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.25-बिहार मध्ये एनडीए ला बहुमत मिळणार असून नितीश कुमार हे बहुमताने पुन्हा बिहार चे मुख्यमंत्री होतील असा विश्वास व्यक्त करून बिहार च्या विकासासाठी विधानसभा निवडणुकीत सर्व जागांवर रिपब्लिकन पक्षाचा एनडीए उमेदवारांना पाठिंबा असल्याची अधिकृत घोषणा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

बिहार राज्यात रिपब्लिकन पक्षाचे संघटन मजबूत आहे. बिहार च्या सर्व जिल्ह्यात रिपब्लिकन पक्षाचे संघटन आहे. बिहारच्या विकासासाठी सर्वप्रथम महागठबंधनला पराभवाची धूळ चरणे गरजेचे आहे.त्यामुळे एनडीए च्या सर्व उमेदवारांना रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी विकासकामे केली आहेत.बिहार ला स्पेशल पॅकेज दिले आहे.बिहार मधील शेतकरी महिला युवा सर्वांना आर्थिक सामाजिक न्याय देण्याचे काम नितीश कुमार करीत आहेत.त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात अनेक चांगली कामे बिहारमध्ये केली आहेत.बिहार मध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्याचे महत्वपूर्ण काम नितीश कुमार यांच्या काळात झाले आहे.त्यामुळे बिहार मधून मुंबई महाराष्ट्राकडे येणारे बेरोजगारांचे लोंढे कमी झाले आहेत.बिहार च्या सर्वांगीण विकासासाठी एनडीए चे सरकार येणे आवश्यक आहे.त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीत सर्व जागांवर रिपब्लिकन पक्षाचा एन डी ला पाठिंबा आहे. सर्व मतदार संघात रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते एन डी ए उमेदवारांचा प्रचार करतील.एनडीए ला बिहारमध्ये बहुमत मिळवून देण्याचा रिपब्लिकन पक्षाचा निर्धार आहे.नितीश कुमार हेच पुन्हा बिहार चे बहुमताने मुख्यमंत्री बनतील असा विश्वास ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.
बिहार मध्ये रिपब्लिकन पक्षाचा एनडीए ला पाठिंबा असल्याबद्दल केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या स्टाईल मध्ये लिहिलेले चारोळी …..
बिहारमध्ये एनडीए बहुमताचे तोडेल सर्व विक्रम …
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहून महागठबंधन होईल चक्रम !
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचा दिसेल पराक्रम ….
नितीश कुमार बिहार चे दहाव्यांदा मुख्यमंत्री होण्याचा करतील विक्रम !
बिहार चा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी एनडीए हाच पर्याय आहे…
म्हणून एनडीए सोबत आरपीआय आहे- केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले





