भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत विविध विकास कामांसाठी ५ कोटी निधी मंजूर- आ.आवताडे

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत विविध विकास कामांसाठी ५ कोटी निधी मंजूर-आ. आवताडे

मंगळवेढा ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०/१०/२०२४- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये सन २०२४ -२५ या वर्षातील विविध विकास कामांसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून ५ कोटी निधी मंजूर झाल्याची माहिती मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.सदर निधीतून मतदार संघाच्या पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांच्या दलित वस्तीमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी व्यायामशाळा बांधणे, अभ्यासिका उभारणे, समाज मंदिर बांधणे व दुरुस्ती करणे,संविधान भवन बांधणे,दलित वस्ती अंतर्गत रस्ते सुधारणा व कॉंक्रिटीकरण करणे आदी विकास कामांचा समावेश असल्याची माहिती आ.समाधान आवताडे यांनी दिली आहे.

या निधीतून पंढरपूर तालुक्यामध्ये मंजूर झालेली कामे पुढीलप्रमाणे- कासेगाव येथील झेंडा चौक येथे संविधान भवन बांधणे २० लाख,भाळवणी येथील मस्के चौक येथे संविधान भवन बांधणे २० लाख, लक्ष्मी टाकळी येथील अण्णाभाऊ साठे नगर मधील लक्ष्मी मंदिरासमोर संविधान भवन बांधणे २० लाख, तावशी येथील आण्णाभाऊ साठे नगर मधील जुन्या जिल्हा परिषद शाळेसमोर संविधान भवन बांधणे २० लाख, अनवली येथील भंडारे वस्ती भीमनगर येथे सभा मंडप बांधणे १५ लाख, मुंढेवाडी येथील मरीआई मंदिरासमोर सभामंडप बांधणे १५ लाख, शिरगांव येथील मरीआई मंदिरासमोर सभामंडप बांधणे १० लाख, कोर्टी येथील मातंग समाज वस्तीमध्ये सभागृह बांधणे १० लाख, तपकिरी शेटफळ येथील बनसोडे वस्ती येथे समाज मंदिर बांधणे १५ लाख, तनाळी येथील दलित वस्तीमध्ये सभा मंडप बांधणे १० लाख,उंबरगाव येथील होवाळे वस्ती येथे सभामंडप बांधणे १० लाख, गोपाळपूर येथील महादेव मंदिराशेजारी सभामंडप बांधणे १० लाख.

या निधीतून मंगळवेढा तालुक्यामध्ये मंजूर झालेली कामे पुढीलप्रमाणे- माचणूर येथे हरिजन वस्ती प्रतीक नगर येथे संविधान भवन बांधणे ४० लाख, आंधळगाव येथील मातंग वस्तीमध्ये संविधान भवन बांधणे २० लाख, सोडी येथील भीमनगर भोरकडे वस्ती संविधान भवन बांधणे २० लाख, बोराळे येथील भीमनगर मध्ये संविधान भवन बांधणे २० लाख, नंदेश्वर येथील इंदिरानगर गावठाण येथे संविधान भवन बांधणे २० लाख, रड्डे येथील भीमनगर गावठाण मध्ये संविधान भवन बांधणे २० लाख, मरवडे येथील आंबेडकर नगर जुना तक्का येथे संविधान भवन बांधणे २० लाख, जुनोनी येथील दलित वस्ती क्रमांक एक भीम नगर मध्ये संविधान भवन बांधणे २० लाख, उचेठाण येथील हरिजन वस्तीमध्ये संविधान भवन बांधणे २० लाख, भाळवणी येथील हरिजन वस्तीमध्ये संविधान भवन बांधणे २० लाख, नंदूर येथील भीमनगर वस्तीमध्ये संविधान भवन बांधणे २० लाख, खडकी येथील कसबे वस्तीमध्ये संविधान भवन बांधणे २० लाख, खुपसंगी येथील इंदिरानगर मध्ये संविधान भवन बांधणे २० लाख, अरळी येथील गावठाण दलित वस्ती मध्ये संविधान भवन बांधणे २० लाख, लवंगी येथील गावठाणमध्ये संविधान भवन बांधणे २० लाख.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या शिक्षण, आरोग्य, रस्ते पाणी या सुविधा समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी या महत्त्वकांक्षी योजनेमार्फत हा भरीव निधी मंजूर झाला आहे. मंजूर झालेल्या सदर निधीमुळे मतदार संघाच्या कार्यक्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व धोरणात्मक विकासासाठी मोठी चालना मिळणार आहे.

  • विकासापासून वंचित असणाऱ्या दलित घटकांच्या विकासासाठी आ.समाधान आवताडे यांनी एवढा मोठा निधी उपलब्ध करून दलितांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मोठी चालना दिली आहे. दलितवस्तीसाठी मंजूर झालेल्या या निधीतून अनेक कामे मार्गी लागणार असून याचा फार मोठा फायदा दलित समाजाला होणार आहे.मतदार संघातील दलित घटकांच्या विकासासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमतःच निधी मंजूर झाल्याने संपूर्ण दलित समाज आ.समाधान आवताडे यांच्या कार्यपद्धतीवर खुश झाला आहे- चंद्रकांत जाधव ज्येष्ठ नेते कासेगाव


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading