महाबोधी महाविहारात शिंवलिंगाची पुजा करणे चुकीचे- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.17 –बुध्दगया येथील महाविहार हे बौध्दांचे सर्वोच्च श्रध्दास्थान आहे.बुध्द गयेतील महाविहार हे बौध्दांचे आहे.महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी देशभरात बौध्दांचे आंदोलन होत आहे.अशा परिस्थितीत बुध्दपौर्णिमेला महाबोधी महाविहारात शिवलिंगाची पुजा करण्याचा प्रकार अत्यंत चुकीचा आणि बौध्दांच्या भावना दुखावणारे आहे अशी तीव्र नाराजी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.
हिंदु मंदिरात शिवलिंगाची पुजा जरुर करावी मात्र बुध्दविहारा मध्ये शिवलिंगाची पुजा करणे अयोग्य आहे.महाबोधी महाविहारात बुद्धपौर्णिमेला बिहारचे राज्यपाल मोहम्मद आरिफ खान यांच्या उपस्थितीत शिवलिंगाची पुजा होत असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर उघडकीस आला आहे.महाबोधी महाविहार शिवलिंगाची पुजा करणे बौद्धांच्या भावना दुखावणारा प्रकार आहे. बुद्धगयेतील बोधी वृक्षाखाली महाकरुणी तथागत भगवान बुध्दांना ज्ञान प्राप्ती झाली. त्याच ठिकाणी महाबोधी महाविहार उभारण्यात आले आहे.हे महाबोधी महाविहार जगभरातील बौद्धांसाठी परमपवित्र श्रध्दास्थान आहे.हे महाबोधी महाविहार बौध्दांचे आहे आणि ते बौध्दांच्या ताब्यात यावे यासाठी देशभर आंदोलन सुरु आहे अशा काळात बौध्दांच्या भावना दुखावण्याचा प्रकार कोणी करु नये. महाबोधी महाविहारा मध्ये शिवलिंगाची पुजा करणे अत्यंत चुकीचे आहे.या झालेल्या प्रकाराबद्दल केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात देण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न सुरू आहेत.महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी प्रधानमंत्री नरेद्र मोदींची ना.रामदास आठवले लवकरच भेट घेणार आहेत.

